गंमतीदारकोडी
१) पंख आहे पण पक्षी नाही
जादू करते पण जादुगार नाही
प्रेमळ आहे पण आई नाही
म्हटलं तर आहे ,म्हटलं तर नाही
गोष्टीची पुस्तक वाचा तर खरी
स्वप्नात येइल मग तुमच्या घरी
ओळखा कोण?
२) भर उन्हाळ्यात, हिरव्यागार रानात
पांढऱ्या मातीत ,लाल ढेकळ
त्यावर पेरल्या काळ्या बिया
खाल्लं तर मिळेल थंडावा
अशी ह्या फळाची किमया
ओळखा कोण?
३) कधी आनंदाचे,कधी दुःखाचे
कधी अपेक्षित , कधी अनपेक्षित
कधी गावातून ,कधी शहरातून
कधी देशातून कधी परदेशातून
गावोगाव चालू असत ह्याच मिरवण
तिकीट घेवून ऐटीत,लाल गाडीतून फिरणं
फोनमुळे आता फारसं विचारत नाही कुणी
काळजाचा तुकडा हा फार आहे गुणी
ओळखा कोण?
४) हिरवी हिरवाई ,हिरवागार रंग
इटूकले ,पिटुकले ,नक्षीदार अंग
औषधाचा गडू , पण चवीला कडू
ओळखा कोण?
५) डोक्यावर तुरा असतो
कृष्णाच्या मुकुटावर सजतो
आकाशात काळे मेघ दाटले
थुई थुई नाचण्यास पाऊल टाकले
पावसाचे स्वागत करतो छान
राष्ट्रीय पक्षी म्हणून घेतो मान
ओळखा कोण?
६) आभाळात दाटी ,रंगबेरंगी पतंगाची
प्रत्येकाला घाई तिळगुळ वाटण्याची
आज होते सूर्याचे ,मकर राशीत संक्रमण
'गोड बोला' असा मंत्र देणारा हा एक सण
ओळखा कोण?
७) आभाळात उडतो पण पक्षी नाही
लांबलचक शेपूट पण वाघ नाही
वेगवेगळे आकार ,निरनिराळे रंग
मला उडवताना लहान थोर दंग
चढाओढीच्या वेळी नीट ठेवा भान
मकरसंक्रांतीच्या दिवशी मला खरा मान
ओळखा कोण?
८) मुकुट याच्या डोक्यावर
जांभळा झगा अंगावर
काटे आहेत जरा सांभाळून
चवीने खातात मला भाजून
ओळखा कोण?
९) हिरव्या रानी पानोपानी
मध्ये कोण बसलंय,राजा का राणी?
काटेदार अंग ,डोक्यावर तुरा
हळूच जरा सांभाळून धरा
हिरवं पिवळ ठिपक्यांचे रूप
याचा रस तुम्हाला आवडतो खूप
ओळखा कोण?
१०) कोकणातून येतो
देश विदेशात जातो
मोठेही याला बघून होतात लहान
असा याचा महिमा महान
पिवळा,केशरी रंगाचा
हा तर आहे फळांचा राजा
ओळखा कोण?
११) एक हिरवा निळा पक्षी
पाणवठयाच्या काठी बीळात राहतो
निमुळत्या,लांब चोचीने
माशाला पटकन गिळून टाकतो
ओळखा कोण?
१२) घरात येते लपून छपून
दुध पिते डोळे झाकून
उंदीरमामा हवा फराळाला
वाघाची मावशी म्हणतात हिल
ओळखा कोण?
१३) आजीबाईच्या शेतात
एका सुपात बारा कणसं
त्याचे तीस-एकतीस दाणे
अर्धे काळे अर्धे पांढरे,
असे हे जीवनगाणे
ओळखा कोण?
१४) भारतीय संस्कॢतीचे प्रतीक
चिखलात राहून अलिप्त
सुर्योदयाला उमलते
सुर्यास्ताला मिटून जाते
सहस्ञदलांची ही आरस छान
"राष्टीय फूल"असा मान
ओळखा कोण?
१५) एक हिरवा निळा पक्षी
पाणवठयाच्या काठी बीळात राहतो
निमुळत्या,लांब चोचीने
माशाला पटकन गिळून टाकतो
ओळखा कोण?
१६) कधी छोटी कधी मोठी
कधी हिरवी ,कधी पिवळी
खाताच अंगात येत बळ
हत्तीच खूप आवडत फळ
वसई असो वा जळगावी
साल मात्र रस्त्यावर टाकायची नाही
ओळखा कोण?
१७)झाडावर तर कधी पिंजऱ्यात
नाजूक काळा गोफ गळ्यात
हिरवागार रंग अंगावर
लाल लाल तोंडली ओठांवर
मिरची न पेरू आवडता खाऊ
पण घाबरतो जवळ येताच मनीमाऊ
ओळखा कोण?
१८) मनीमाऊचा भाचा
पण अंगावर वाघासारखे पट्टे नाहीत
जेवढा जोरात पळतो
तेवढ्याच चपळाईने झाडावर चढतो
ओळखा कोण?
१९) पावसाळ्यात नवी पालवी
हिवाळ्यात हिरवा पाला
उन्हाळा लागताच पानगळ
मोहरल्या शेंदरी ज्वाला
टपटप फुलं खाली पडताच
जणू जमिनीवर गालिचा झाला
ओळखा कोण?
( खुल जा सीम सीम.. )
२०) सुपासारखे कान
खांबासारखे पाय
भिंतीसारखे पोट
झाडूसारखी शेपूट
गणपतीला तोंड
लांबचलांब याची सोंड
ओळखा कोण?
21) कंबर बारीक ,आयाळ छान
एक पंजा पडला तर ,तुमचा जाईल प्राण
याची गर्जना ऐकताच सारेजण घाबरतात
'जंगलचा राजा 'असे याला म्हणतात
ओळखा कोण?
२२) रात्रीच्या दाट अंधारात
झाडावर नभीच्या चांदण्या
कशा काय उमलल्या?
मंद सुगंधाचा दरवळ
कुठल्या राणीचा आला?
ओळखा कोण?
२३) स्वर्गीची मन्दाकिनी
शन्कराच्या जटेवर विसावली
भगीरथाच्या प्रयत्नाने
पृथ्वीवर वाहू लागली
घेऊन पवित्र नदीचं रुप
जीवन सुजलाम सुफलाम केलं
ओळखा कोण?
२४) तीक्ष्ण डोळे, बाकदार चोच
उंच भरारी घेतो आकाशात
विष्णूचं वाहन, सापाचा शत्रू
पक्ष्यांचा राजा शक्तिमान
ओळखा कोण?
२५) छोटी छोटी आखूड शिंग
पिवळा चाकलेटी रंग
काट्कुळे पाय छान
झाडाच्या टोकापर्यंत उंच मान
ओळखा कोण?
२६) मोती पोवळ्याचे रुप
बघताच पडते मनाला भूल
सत्यभामॆकडे असलं तरीही
रुक्मिणीच्या अंगणात पडणारं फूलं
स्वर्गीचा पाहूणा का देववृक्ष
ओळखा कोण?
२७) पाठीवर घर घेऊन
सावकाश चालते
हिला नाही घाई
बारशाला निघाले तर
लग्नाला पोहोचते
हिला म्ह्णतात हळूबाई
ओळखा कोण?
२८) कधी चढता कधी उतरता
असा याचा आकार
शिंपीदादा देतो याचे
कपडे शिवायला नकार
आकाशातील रहिवासी
नाते याचे प्रत्येकाशी
ओळखा कोण?
२९) कधी जमिनीवर,कधी पाण्यात
बटबटीत डोळे,अंग हिरवे-तांबडे
खाण्यासाठी किडे पकडतो
सापाला मात्र खूप घाबरतो
डराव डराव म्ह्णत उड्या मारतो
ओळखा कोण?
३०) एक किटक स्वत:तच रमणारा
स्वत:भोवतीच कोष विणणारा
कोषाबाहेर येताच,रुप याचं बदलतं
उडताना बघून,मन तुमचं मोहरतं
रंगाची उधळण पंखावर घेऊन
फुलांवर बसून मध घेतो पिऊन
तोडू नका पंख याचे,आयुष्य याचं छोटं
स्वच्छंद बहरु द्या बागेत, मन करा तुमचं मोठं
ओळखा कोण?
३१) शेतकर्यांचा मेघदुत,
देतो पाऊसाची चाहुल
पेर्तेव्हा,पेर्तेव्हा,शिळेवर नाचवतो पाऊल
ओळखा कोण?
३२) पाण्यात राह्तो पण हवेत श्वास घेतो
व्हेलचा दुरचा भाऊ असतो
खेळकर आणि हुशार,रंग याचा निळाशार
थोडीशी पोपटपंची करतो
लहान,मोठ्यांचा दोस्त असतॊ
ओळखा कोण?
३३)हिरव्यागार रानात
लाल केशरी फूल
जमिनीवर सडा
जणू धरणीचे मुल
जंगलची ज्वाला
भान हरपून पाहू
वानर,खारी,मोरांचा
सकस आवडता खाऊ
ओळखा कोण?
३४) फुलांवर बसते पण फुलपाखरु नाही
गोड आवडतं पण मुंगी नाही
झाडावर घर बांधते पण पक्षी नाही
गाणं म्हणते पण गवई नाही
चावते जेवढी चटकन,सूज येते पटकन
ओळखा कोण?
३५) सगळ्यात हुशार पक्षी, सहजगत्या उडतो
पुढे,मागे,वरती,खालती हवा तसा फिरतो
लाल फुलामधील मध याला खूप आवडतो
ओळखा कोण?
३६) बर्फाळ प्रदेशात राहतॊ
पाण्यात चांगला पोहतो
लुटूलुटू चालतो,जोरजोरात पळतो
छोटेसे पंख पण उडता येत नाही
ओळखा कोण?
३७) दर्याखोर्यात आदिवासी भागात
ठेवतात याला पानांच्या द्रोणात
डोंगरची काळी मैना,छोटं काळं फळ
रानमेवा हा खाल्ला तर अंगात येईल बळ
ओळखा कोण?
३८) झाडाझाडांवरुन फिरतो
सरसर नाहिसा होतो
नानाविध रंग बदलतो
किडे खाऊन पोट भरतो
जीभ याची लांब असते
कुंपणापर्यंतच धाव असते
ओळखा कोण?
३९) पांढरा,पांढरा कापसाचा गोळा
त्यावर लाल गुंजेचा डोळा
चांदॊमामाचा रथ ओढतॊ
पान पडलं तरी धूम ठोकतॊ
ओळखा कोण?
४०) बकरीसारखे केस,गायीसारखं डोकं
घोड्यासारखं शेपूट,अस्वलासारखा आवाज
हजार किलो वजनाचा,शाकाहारी प्राणी
थंड प्रदेशातील गाय,असं म्हणतात कुणी
ओळखा कोण?
४१) मधुर रसाचं,उष्ण प्रकृतीचं
’अ’ जीवनसत्वानं भरपूर
रोज खाल्लं तर नेत्ररोग ठेवतो दूर
ससोबाला भारी याचं खूळ
जमिनीच्या खाली येतं हे कंदमुळं
ओळखा कोण?
४२) हिरवी,काळी फळं कशी
एकावर एक ठेवली रचून
आंबट आहे असं म्हणून
कोल्हा गेला लांबून निघून
वेलीवरील नक्षीदार पान
नासिकची ’प्रसिध्द’ असा मान!
ओळखा कोण?
४३) जशी पाकळीवर पाकळी,तसं पानावर पान
तरी ह्या फुलाला मिळतो,भाजीचाच मान!
कच्ची वा शिजवून,पण खायलाच हवी
भरपूर जीवनसत्व मिळतील,याची आहे हमी!
ओळखा कोण?
४४) आंबट गोड आहे पण चिंच नाही
रस आहे पण लिंबू नाही
गॊल आहे पण चेंडू नाही
आजारी पडल्यास हवीच हवी
तुम्हांला देईल शक्ती नवी!
ओळखा कोण?
४५) आंब्याला मोहर अन् वसंताची चाहूल
गाणं म्हणून आपल्याला देतं कोण?
स्वत:ची अंडी उबविण्यासाठी
कावळ्याच्या घरट्यात ठेवतं कोण?
ओळखा कोण?
४६) मोट ओढतो,शेतात राबतो
घाणा चालवितो, गोठ्यात राहतो
वर्षभर काम करतॊ
पॊळ्याला हक्काचा आराम करतॊ
ओळखा कोण?
४७) घरातल्या एका कोपर्यात बसतो
वेळी-अवेळी वाजत असतो
मला घ्या,मला घ्या म्हणून ओरडत असतो
कधी बरोबर तर कधी चूकीचा असतो
पण खरचं जर हा झाला गप्प
कितीतरी कामं होतात ठप्प
एवढ्या महत्वाचा हा आहॆ तरी कोण?
ओळखा कोण?
४८) देवबाप्पा जेव्हा छोटा होता
तेव्हा तॊही शाळेत जात होता
एकदा काय गंमत झाली
त्याची रंगपेटी पडली खाली
रंग सारे सांडून गेले
ढगांनी ते पटकन गॊळा केले
ओळखा बरं ते रंग कोणाला दिले?
कोण मग आकाशात ’सप्तरंगी’ झाले?
ओळखा कोण?
४९) गोल,चौकोनी,त्रिकोणी,असा याचा आकार
काच,धातू,प्लॅस्टिकमध्ये,करतात साकार
रंग,रुप,नक्षीने याच्या मोहून जातं मन
हातामध्ये घालतात,हे तर स्त्रीचं एक आभूषण
ओळखा कोण?
५०) चणाडाळ खातो,शक्ति मिळवतॊ
शेपूट याची झुबकेदार,टाच मारताच दौडत नेईल
चला व्हा याच्यावर स्वार
ओळखा कोण?
५१) हिरवा पिवळा रंग,आंबट-गोड चव
’क’ जीवनसत्वाने भरपूर
गावं माझं नागपूर!
ओळखा कोण?
५२) आगमनाने याच्या सृष्टी फुलते
पानोपानी चैतन्याची खूण उमलते
कोकीळाही कुहूकुहू करते
आमराई मोहरुन जाते
माघ शुध्द पंचमीला,सोळा कलांनी फुलणारा ऋतू
ओळखा कोण?
५३) काळा काळा रंग,वस्तू कुरतडण्यत दंग
मनीमाऊ येताच पळून जातॊ
बिळात जाऊन दडून बसतो
ओळखा कोण?
५४) कधी ढोबळी,कधी काकडी
कधी जाडी,कधी बारीक
कोल्हापूरची प्रसिध्द लवंगी
खाताच येते डोळ्यात पाणी
ओळखा कोण?
५५) लांब लांब दाढी मिशा
पाटीलबुवांच्या छान
लपवलेत त्यांनी मोती
ठेवून पानावर पान
भाजा किंवा लाह्या करा
आवडीने खातात लहानसहान!
ओळखा कोण?
५६) कोकणातून आलो टाकीत धापा
आता बरका म्हणा वा कापा
अंगांखांद्यावर झाडाच्या फळं येतात
कच्ची असेल तर भाजी म्ह्णून खातात
वरुन आहे एकदम काटॆरी अंग
मात्र गॊड,रसाळ अंतरंग!
ओळखा कोण?
५७) एका हट्टी मुलीला
लख्ख प्रकाशाची आवड फार
मागे,पुढे तुमच्या बरोबर फिरणार
अंधाराला मात्र घाबरते फार
आणि द्डून बसतॆ मग गुडूपगार!
ओळखा कोण?
५८) नाही बदक, नाही बगळा
हा आहे पक्षी आगळावेगळा
दूध आणि पाणी वेगळं करतो
आणि मोत्याचा चारा खातो
आकाशातून तरंगत जातो
जणू शुभ्र फुलांची माळ
डौलदार,राजबिंडा विहरतो तळ्यात
याच्यामुळे शोभा, राजाराणीच्या काळात
ओळखा कोण?
५९) एका महालात बत्तीस खॊल्या
त्यात राहते एकच राणी
सारखं सारखं मागे पाणी
ओळखा कोण?
६०) कधी पाण्यात पोहतो
कधी जमिनीवर चालतो
ढालीसारख्या पाठीला याच्या
खडक समजतात दुरुन
मात्र जवळ येताच कुणी
हातपाय घेतो हा गोळा करुन
मंदिरापुढे असतं याचं स्थान
सशाबरोबर शर्यतीत मिळवला पहिला मान!
ReplyDeleteI found this article which is related to my interest. The way you covered the knowledge about the subject and the university in bhopal was worth to read, it undoubtedly cleared my vision and thoughts towards best private university in central india . Your writing skills and the way you portrayed the examples are very impressive. The knowledge about Top Universities of Central India is well covered. Thank you for putting this highly informative article on the internet which is clearing the vision about top universities in bhopal