Showing posts with label गाणं. Show all posts
Showing posts with label गाणं. Show all posts

Thursday, 25 February 2016

मीनाचा हक्क

माझा राजू पण शिकावा, मीना हक्क  का नसावा,
शिक्षणाचा तर हक्क , माझ्या  मीना पण असावा // धृ//
     नको चूल अन् मुल, ते घरदार सांभाळणं,
      बालवयात हे लग्न , रुढीवादाचं जीणं,
       असा त्रास  नका देवू , मुलगी म्हणून ह्या जीवा //१//
मुलगा मुलगी  समान, असे दोघेही महान,
होईल  दोघांची  प्रगती , अन् मिळेल सन्मान,
आमचाही उत्कर्ष , लहान थोरांना दिसावा //२//
         ज्योतिबा  फुलेंनी, लावली  शिक्षणाची ज्योत ,
          जीर्णरुढीच्या तत्वावर , केली महिलांनी मात,
          कटुसत्य हो घटना, रागदोष हा नसावा //३//