माझा राजू पण शिकावा, मीना हक्क का नसावा,
शिक्षणाचा तर हक्क , माझ्या मीना पण असावा // धृ//
नको चूल अन् मुल, ते घरदार सांभाळणं,
बालवयात हे लग्न , रुढीवादाचं जीणं,
असा त्रास नका देवू , मुलगी म्हणून ह्या जीवा //१//
मुलगा मुलगी समान, असे दोघेही महान,
होईल दोघांची प्रगती , अन् मिळेल सन्मान,
आमचाही उत्कर्ष , लहान थोरांना दिसावा //२//
ज्योतिबा फुलेंनी, लावली शिक्षणाची ज्योत ,
जीर्णरुढीच्या तत्वावर , केली महिलांनी मात,
कटुसत्य हो घटना, रागदोष हा नसावा //३//
Thursday, 25 February 2016
मीनाचा हक्क
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment