��ज्ञानरचनावादी उपक्रम �� माझी शाळा माझे उपक्रम : " जादूई पेटारा ज्ञान कुंभ" कृती : �� प्रथम रिकामा खडूचा बाॅक्स घेणे. �� त्याला रंगीत गिप्ट पेपरचे आवरण चिटकून आकर्षक करणे.. ��त्यात विविध नकला, प्राणी पक्षीचे आवाज , वस्तू दाखवा, वस्तू आणा, गाणी , गोष्टी , कविता , पाठ्यपुस्तकातील चित्र वर्णन, प्रश्न, अनुभव कथन इ. चिठ्ठ्या तयार करून टाकणे. ��एक एक विद्यार्थीला पुढे बोलवून बाॅक्स मधून चिठ्ठी काढायला सांगणे �� चिठ्ठी सर्वांना दाखवून त्यातील मजकूर वाचायला सांगणे. �� मजकूरात लिहिल्याप्रमाणे कृती करायला लावणे. ��ज्या विद्यार्थीला कृती करता आली नाही तो विद्यार्थी त्या दिवसापुरता खेळातून बाद होईल याची कल्पना विद्यार्थीना देणे. �� प्रत्येक विद्यार्थी ला संधी मिळावी याकडे लक्ष ठेवणे . �� हा उपक्रम दररोज 4.30 नंतर घेतल्यास दिवसभराच्या अभ्यासक्रमातील उपक्रमाच्या क्षिणातून मुक्त होऊन विद्यार्थी प्रसन्न मनाने घरी जातो. ���������������� उपक्रमांची यशास्विता..... �� विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळते. �� विद्यार्थी आवड जोपासायला मदत होते . �� विद्यार्थ्यांच्या विविध विषयातील कला समजतो. �� मनोरंजनातुन ज्ञानाची निर्मिती सहज शक्य होते . �� विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो. �� दिवसभराच्या अभ्यासाचा शीण घालवता येतो.. �� अभिनय,संवाद, वाचन,आकलन,कृती युक्त सादरीकरण,समय सुचकता इ.गुणांची खेळातून पडताळणी करता येते . �� प्रत्यक्ष कृतीतून घेतलेले अनुभव चिरकाल स्मरणात राहतात . ������������������ ��मनोरंजक मोफत खेळातुन शिक्षण�� ➖➖➖➖Ⓜ����➖➖➖ �� चढता उतरता क्रमाची लगोरी �� साहित्य - शाळेतील लगोरी संच कृती - लगोरीमध्ये दहा ठोकळे असावेत.सर्वात लहान ठोकळ्यावर बाजुने गोलाकार वेगवेगळ्या रंगात १०,२०,३०,४०,५०....अशा प्रकारे १०० पर्यत अंक लिहावेत.त्यानंतरच्या ठोकळ्यावर त्याच रंगाच्या क्रमाने ९,१९,२९३९,.....९९ व अशा प्रकारे सर्वात मोठया ठोकळ्यावर १,११,२१,३१,.....९१ असे अंक येतील. नियम - १) लगोरी लावतांना सर्वात मोठा ठोकळा हा सर्वात खाली रचला जातो.त्यानंतर लहान लहान ठोकळे रचले जातात. २) त्यामुळे सहाजीकच अंकाचा क्रम वर चढता येतो. ३) ठोकळे रचतांना १,२,३...अश्या चढत्या क्रमानेच रचणे आवश्यक असतील. ४) एकदा लगोरी लागल्यानंतर पुढे त्याच ठोकळ्यावरिल १,११,२१,हे क्रमांक एकावर एक येतील असे रचावे लागतील. ५) अशाप्रकारे जश्या जश्या लगो-या लागतील. लगोरीच्या वरिल क्रमांक पुढे पुढे वाढत जातील. ६) लगोरी पूर्ण न लागताच बाद झाल्यास त्याच क्रमांकानुसार परत लगोरी लावावी लागणार. ७) ज्या टिमची लगोरीचा क्रमां चढता
संकलन
Monday, 29 February 2016
उपक्रम
ज्ञानरचनावाद
Drop down
Blog
Blog कसा बनवावा ब्लॉग कसा बनवावा. How To Create New Blog... ब्लॉग हे वेबलॉग या शब्दाचे लघुरुपांतर आहे. हा संकेतस्थळाचाच म्हणजे वेबसाईटचाच प्रकार आहे. ब्लॉग हे एक व्यक्ती किंवा व्यक्तिंचा समूह ब्लॉग निर्माण करतो. ब्लॉगमध्ये मजकूर, व्हिडीओज, ऑडिओज, चित्रे आणि वेबलिंक्स (सांधे) दिलेले असतात. नविन मजकूर ब्लॉगवर लिहिणे किंवा प्रकाशित करणे याला 'ब्लॉगिंग' असे म्हणतात. ब्लॉगवरील लेखांना 'ब्लॉगपोस्ट' 'एन्ट्रिज' म्हणतात. ब्लॉग लिहीणा-या लेखकांना ब्लॉगर म्हणून संबोधले जाते. आज ब्लॉगवर कोट्यावधी लेख नविन ब्लॉग वेबवर झळकत आहेत. चला तर मग आपणही नविन ब्लॉग तयार करुया..... नविन ब्लॉग तयार करण्यासाठी आवश्यक घटक..... १. स्वत: चा Gmail ID 2. नेट कनेक्शन वरील दोन्ही गोष्टी उपलब्ध असतील तर ब्लॉग तयार करण्यासाठी काही अडचण येणार नाही फक्त ५ मिनीटात तुमचा ब्लॉग तयार होईल. सर्वप्रथम www.blogger.com या साईटवर तुमच्या gmail Id व्दारे Log in करा. Log in केल्यानंतर Bogger Dashboard open होईल जसे...  blogger dashboard वर New blog असे चौकट किंवा बटन दिसेल त्यावर क्लिक करा लगेच दुसरा विंडो उघडेल. जसे.....  वरील विंडोजमध्ये तुम्हाला ब्लॉग टाईटल (Title) द्यावे लागेल उदा. Address मध्ये तुमच्या ब्लॉगला तुम्ही काय अड्रेस देणार आहात हे ठरवावे लागेल. तुमच्या नावाने अड्रेस तयार करता येईल. किंवा blog address टाईप केल्यानंतर उपलब्ध आहे किंवा नाही तपासून पाहिले जाईल उपलब्ध नसेल तर sorry this blog address is not available म्हणून त्याखाली मेसेज दिसेल दुस-या नावाने प्रयत्न करा उपलब्ध असेल तर blog address is available असा मेसेज येईल available असेल तर सर्वात खाली दिसणा-या Create blog वर क्लिक करा तुमचा ब्लॉग तयार होईल. जसे....  तुम्ही तयार केलेला ब्लॉग डॅशबोर्डवर दिसू लागेल. त्याच्या खाली एक मेसेज दिसेल Start posting वर क्लिक करा किंवा पेन्सिलचा चित्र दिसत आहे त्यावर क्लिक करा ब्लॉग पोस्टींगचा विंडो उघडेल. जसे....  वरील ब्लॉग पोस्टच्या विंडोमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी महत्त्वाचे आहेत Post समोरील चौकोनात ब्लॉगचा Title लिहा खाली मोठा स्पेस दिसेल त्यामध्ये तुमचा विचार , मुद्दे , चित्रे आणि लिंक्स तयार करु शकता लेख पूर्ण झाल्यानंतर उजव्या बाजूला दिसणा-या Publish वर क्लिक करा तुमचा लेख ब्लॉगवर प्रकाशित होईल तेही कोणत्याही प्रकाशकाशिवाय. संकलन सतिश मुणगेकर
ब्लॉग
Sunday, 28 February 2016
नियम
अभ्यास करण्याचे काही नियम
* स्वतः वर विश्वास ठेवा आणि ध्येय ठरवा.
* वेळापत्रक बनवा व त्याप्रमाणे वागा.
* जे महत्त्वाचे आहे त्याच्यासाठी वेळ खर्च करा.
* चुकांना घाबरु नका.त्यातून बरेच काही शिकता येते.
* आपली जास्तीत जास्त बुद्धिमत्ता शैक्षणिक साधने बनविण्यासाठी वापरा.
* कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कामाचे व्यवस्थापन करायला शिका.
* २४ तासांपैकी ८ तास झोप +६ तास शाळा+१तास जेवण + १ तास इतर +२ तास खेळणे असं एकूण वेळापत्रक असलं तरी ५-६ तास उरतात. हा पूर्ण वेळ अभ्यासाला दिलात तर वर्षभर अभ्यासाची छान तयारी होते.
* दिवसा सगळा वेळ नीट वापरला तर रात्री जागरण करुन अभ्यास करण्याची जरुरी नाही.
* वेळापत्रकात प्रत्येक विषयाला वेळ दिला गेला पाहिजे . अवघड वाटणाऱ्या विषयांना जास्त वेळ द्यावा .
* पाढे, सूत्रे व आकृत्या यांना वेगळा वेळ देऊन विशेष तयारी करावी. * उत्तरे पाठ करु नयेत. आपल्या भाषेत मुद्यांमध्ये उत्तरे लिहुन काढावीत.इंग्रजी स्पेलिंग, अर्थ पाठ करावेत. विज्ञानाच्या व्याख्या पाठ कराव्यात .गणिते सोडवावीत.सखोलपणे धडा अभ्यासावा.
* आळस, अस्थिरता, तुलना, न्युनगंडता टाळा आणि ' मला येतच नाही ' असे न समजता ' प्रयत्न केले तर मला नक्कीच येईल ' ही भूमिका बाळगा.
संकलन
सतीश मुणगेकर