Monday, 30 January 2017
Friday, 20 January 2017
Monday, 26 September 2016
तंत्रज्ञान
Monday, 20 June 2016
कपालभारती
Tuesday, 19 April 2016
वेबसाईट
Wednesday, 13 April 2016
उपक्रम
🎄ज्ञानरचनावाद उपक्रम🎄 〰〰〰〰〰〰〰〰〰 🦁उपक्रम :-२७) 🎍भागाकार करण्यासाठी वापरावयाच्या वेगवेगळ्या ऱचनावादी पद्धती 🎍 १) व्यवहार पध्दत :- 🌰साहीत्य :- खडे ,गोट्या , मणी , बिया , चिंचोके 🌰 अगोदर विध्यार्थ्याना खडे घेण्यास सांगु . ते विध्यार्थ्यात वाटुन द्या . व त्याना प्रश्न विचारा जसे 👇🏾 उदा . १५ खडे घे . तुझ्या ३ मित्राना एकेक करुन सारखे वाट . १) कीती खडे होते ? २) प्रत्येकालाकीती खडे मिळाल ३) शिल्लक कीती राहीले ? वरीलप्रमाणे आठ दहा वेळा सराव करुन घ्यावा . २) वरील भागाकार पध्दतीचे फलक लेखन जसे 👇🏾 प्रत्येकाला ५ _____________ कीती / खडे १५ विध्यार्थ्याना३ / वाटले १५ / ___________ शिल्लक ०० मुलाकडुन वरील ॲक्टीव्हीटी करुन घ्या . मुल कृती करीत असताना आपण त्याच्या कृतीप्रमाने फलक लेखन करावे . उदा .. संजु कडे १५ खडे होते . त्याने ३ मुलाला समान वाटले तेव्हा प्रत्येकाला ५ खडे मिळाले . आपण ५० पर्यंत संख्याची वाटणी असेच करु शकतो . त्यासाठी विध्यार्थ्याजवळ ५० खड्याची एक पेटी असावी . फरशीवर विध्यार्थ्याला वरील कृती करु द्या . नंतर वहीवर प्रत्येक विध्यार्थ्याजवळ ३६ खडे द्या . पहीले त्या बियाचे २ समान गट करुन घ्या . नंतर त्याच बियाचे ३ समान गट करुन उत्तर मांडा . त्याच बियाचे ४,५,६,७,१० पर्यंत समान गट करुन येणारे उत्तर व शिल्लक कीती राहीले हे विचारा . वरील पध्दतीने ३५ या संख्येचे ३५ गटापर्यंत विध्यार्थी उत्तर काढु शकतात .. याने भरपुर सराव होईल भागाकाराचा . 🙏🏾धन्यवाद 🙏🏾 🔘 🔘 ➖➖➖➖➖➖➖➖➖
Monday, 28 March 2016
वैद्यकीय बील माहिती
वैद्यकीय बील तयार करताना खालील कागदपत्र महत्त्वाची आहेत. ते बिलासोबत सादर करणे आवश्यक आहे.
१) आजाराबाबतचे डॉक्टरांचे इमर्जंसी सर्टीफिकेट.
२) सर्टीफिकेटमध्ये नमूद केलेला आजार हा शासन मान्य एकूण २७ आजारांपैकी असला पाहिजे .
३) डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या पावत्या व प्रत्यक्ष औषधे खरेदी केलेली बीले यावर डॉ .ची सही शिक्का मारुन त्यावर कर्मचाऱ्याची सही मागील बाजूस असावी .
४) सन १९६८ पूर्वी सेवेतील कर्मचारी असेल व मुलांचा जन्म ६८ पूर्वी असेल तर तीन पेक्षा अधिक मुलांची फ्यमिलीसाईज ग्राह्य धरली जाते. पण सन १९६८ नंतरची जन्म झालेली मुले यांची प्यमिली तीन किंवा त्यापेक्षा कमी असेल त्यांनाच वैद्यकीय बील देय आहे.
वैद्यकीय बिलाबाबत सध्याच्या प्रचलित पध्दती व शासन नियमाबाबत या लेखात अल्पशी माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे .
आजार
१) हृदय विकाराचा झटका,फुप्फुसाचा झटका
२) अतिरिक्त दाब
३) धनुर्वात
४) घटसर्प
५) अपघात
६) गर्भपात
७) तिव्र उदर वेदना, आंत्र अवरोध
८) जोरदार रक्तस्त्राव
९) ग्यास्ट्रो
१०) विषमज्वर
११) कोमा
१२) मनोविकृतीची सुरूवात
१३) डोळ्यांतील दृष्टिपटल सरकणे
१४) स्त्री रोग शास्त्र वा प्रसुती शास्त्र संबंधित आजार
१५) जननमूत्र आकस्मिक आजार
१६) वायूकोष
१७)कान नाक घसा यांमध्ये विजातीय पदार्थ गेल्यामुळे निर्माण झालेले
आजार
१८) तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अशा जन्मजात असंगती
१९) ब्रेन ट्युमर
२०) भाजणे
२१) इपिलेक्सी
२२) ॲक्यूट ग्ल्यकोमा
२३) उष्माघात
२४) रक्तासंबंधित आजार
२५) प्राणी चावल्यामुळे होणारी विषबाधा
२६) रसायनामुळे होणारी विषबाधा
गंभीर आजार
१) हृदय शस्त्रक्रिया
२) हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया
३) ॲन्डिओप्लास्टी
४) मुत्रपिंड प्रतिरोपण
५) रक्ताचा कर्करोग










