Monday, 28 March 2016

वैद्यकीय बील माहिती

         वैद्यकीय बील तयार करताना खालील कागदपत्र महत्त्वाची आहेत. ते बिलासोबत सादर करणे आवश्यक  आहे.

१) आजाराबाबतचे डॉक्टरांचे इमर्जंसी सर्टीफिकेट.

२) सर्टीफिकेटमध्ये नमूद केलेला आजार हा शासन मान्य एकूण  २७ आजारांपैकी असला पाहिजे .

३) डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या पावत्या  व प्रत्यक्ष  औषधे खरेदी  केलेली  बीले यावर डॉ .ची सही शिक्का मारुन त्यावर कर्मचाऱ्याची सही मागील बाजूस  असावी .

४) सन १९६८ पूर्वी  सेवेतील कर्मचारी  असेल व मुलांचा जन्म  ६८ पूर्वी  असेल तर तीन पेक्षा  अधिक मुलांची फ्यमिलीसाईज ग्राह्य धरली जाते. पण सन १९६८ नंतरची जन्म  झालेली मुले यांची  प्यमिली तीन किंवा  त्यापेक्षा  कमी असेल  त्यांनाच  वैद्यकीय  बील देय आहे.
            वैद्यकीय  बिलाबाबत सध्याच्या प्रचलित पध्दती  व शासन नियमाबाबत या लेखात  अल्पशी माहिती देण्याचा  हा एक प्रयत्न आहे .

                                      आजार 

१) हृदय विकाराचा झटका,फुप्फुसाचा झटका
२) अतिरिक्त  दाब
३) धनुर्वात
४) घटसर्प
५) अपघात
६) गर्भपात
७) तिव्र उदर वेदना, आंत्र अवरोध
८) जोरदार रक्तस्त्राव  
९) ग्यास्ट्रो
१०) विषमज्वर
११) कोमा
१२) मनोविकृतीची सुरूवात
१३) डोळ्यांतील दृष्टिपटल सरकणे
१४) स्त्री रोग शास्त्र वा प्रसुती शास्त्र  संबंधित आजार
१५) जननमूत्र आकस्मिक आजार
१६) वायूकोष
१७)कान नाक घसा यांमध्ये विजातीय पदार्थ  गेल्यामुळे  निर्माण  झालेले
      आजार
१८) तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अशा जन्मजात असंगती
१९) ब्रेन ट्युमर
२०) भाजणे
२१) इपिलेक्सी
२२) ॲक्यूट ग्ल्यकोमा
२३) उष्माघात
२४) रक्तासंबंधित आजार 
२५) प्राणी  चावल्यामुळे होणारी विषबाधा
२६) रसायनामुळे होणारी  विषबाधा

             गंभीर आजार

१) हृदय शस्त्रक्रिया 
२) हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया
३) ॲन्डिओप्लास्टी
४) मुत्रपिंड प्रतिरोपण
५) रक्ताचा कर्करोग

                                           

No comments:

Post a Comment