========================
*👭🛑 परिपाठ सामान्यज्ञान🛑👭*
*१) कोंबडीच्या घराला काय म्हणतात ?*
*उत्तर -- खुराडे*
*२) सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात ?*
*उत्तर -- छावा*
*३) दोन नद्या एकत्र मिळतात त्या ठिकाणास काय म्हणतात ?*
*उत्तर -- संगम*
*४) आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात ?*
*उत्तर -- राई*
*५) चिमणीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?*
*उत्तर -- चिवचिव*
*६) पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात ?*
*उत्तर -- घरटे*
*७) हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात ?*
*उत्तर -- पाडस / शावक*
*८) उंदराच्या घरास काय म्हणतात ?*
*उत्तर -- बीळ*
*९) गाईच्या घराला काय म्हणतात ?*
*उत्तर -- गोठा*
*१०) जादूचे खेळ करून दाखवणा-यास काय म्हणतात ?*
*उत्तर -- जादूगार*
*११) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?*
*उत्तर -- वासरू*
*१२)) घोड्याच्या घराला काय म्हणतात ?*
*उत्तर -- तबेला*
*१३) बकरीच्या पिल्लाला काय म्हणतात ?*
*उत्तर -- करडू*
*१४) च़ंद्रापासून येणा-या प्रकाशाला काय म्हणतात ?*
*उत्तर -- चांदणे*
*१५) म्हशीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?*
*उत्तर -- रेकणे*
====================
🔲🔲🌈🌱🌳🌱🌈🔲🔲
माहिती व विविध प्रकारचे रंजक उपक्रम वाचवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून ब्लाॅगवरून माहिती मिळवा. (सामान्यज्ञान माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)*👇
http://www.mungekarsatish.blogspot.com
No comments:
Post a Comment