Saturday, 5 March 2016

व्याकरण

थोडेसे व्याकरण १.व्याकरण : भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व त्याच्या परस्परांशी असलेला संबंध ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात. २.वर्ण विचार : ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात. १.स्वर :ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात . १.ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ . २.दिर्घ स्वर : आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ. ३.स्वरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात उदा-अं,आ: ४.सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थानातून निघणारे उदा-अ,आ /इ,ई /उ ,ऊ . ५.विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर उदा-अ ,इ /आ ,ई /अ ,उ . ६.सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय . उदा-अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ . २.व्यंजन : ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात . १.महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते. २.अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते. ३.स्पर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प ४.अंतस्थ व्यंजन :य,र,ल ,व. ५.उष्ण व्यंजन :श ,ष ,स ६.नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म . ३.वर्णाची उच्चार स्थाने : १.कंठ्य :क,अ,आ. २.तालव्य :च,इ,ई, ३.मूर्धन्य :ट ,र,स. ४.दंत्य : त,ल,स ५.ओष्ठ्य :प,उ,ऊ . ६.अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म, ७.कंठ तालव्य :ए ,ऐ. ८.कंठ ओष्ठ :ओ,औ. ९.दान्तोष्ठ : व . ४.वर्णमाला शिकवितांना वापरावयाचे दृक श्राव्य साधने : १.वर्णमालेच तक्ता वापरणे. २.शब्द पट्या वापराव्या. ३.चित्राचा वापर करावा –गरुड “ग” ४.खादा फलक वापरावा. ५.रेषा,गोल,अर्धवर्तुळ ,कमान काढून दाखवणे, ६.रंगीत खडू व रंगीत चित्राचा वापर करणे . ७.विद्यार्थाला वर्णमालेच्या वह्या बाजारातुन उपलब्ध करून देऊन प्रात्यक्षिक देणे. ८.हस्ताक्षर स्पर्धा घेणे. ५.शब्दाच्या जाती : १.विकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात. १.नाम (संज्ञा )व्यक्ती ,वस्तु,स्थान,पदार्थ ,जागा, १.व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल. २.जातीवाचक संज्ञा :गाव,नदी. ३.भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य. ४.समूह वाचक संज्ञा :भीड,संघ . द्रव्य वाचक संज्ञा :पाणी,सोना २.सर्वनाम : नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी १.पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु. २.निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या, ३.अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही. ४.संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे . ५.प्रश्न वाचक सर्वनामे :का ?काय?कोठे ? कोण ? कोणाला ?कोणाचा ? कोणता ? केंव्हा ?किती ? ३.विशेषण : नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे . १.गुण वाचक विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार . २.संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन. ३.परिणामवाचक विशेषण : चांगला परिणाम ,वाईट परिणाम . ४.संकेत वाचक विशेषण :हे ,ते . ४.क्रियापद : एखादी क्रिया घडणे . १.सकर्मक क्रियापद :पाहणे ,खेळणे . २.अकर्मक क्रियापद : हसणे ,रडणे.धावणे, ३.संयुक्त क्रियापद :आहे, होता, असेल . २.अविकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात. १.क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे . १.स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा . २.कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल . ३.परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व. ४.रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू ,जोरात . २.शब्दयोगी अव्यव :नामाला व सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द .स,ला,ना,ते ,आत ,बाहेत,जवळ,पुढे . ३.उभयान्वयी अव्यय :दोन किंवा तीन वाक्य एकत्र करणारा शब्द .आणि ,पण,परंतु, किंवा . ४.केवळ प्रयोगी अव्यय : आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द . वाह !, अरे !, छट ! ५.लिंग विचार व वचन विचार : लिंग विचार : १.पुल्लिंग –मोर,विद्वान,उंट . २.स्त्रील्लिंग :लांडोर,विदुषी,सांडणी. ३.नपुसकलिंग : झाड,घर,पुस्तक . वाचन विचार : १.एक वचन: पुस्तक . २.अनेक वचन : पुस्तके . ३.बहुवचन : आपण,तुम्ही .सारे,सर्व, ६.संधी विचार: १.जगन्नाथ : जगत +नाथ . २.गुर्वाज्ञा : गुरु +आज्ञा . ३.सुर्याद्य : सूर्य + उदय . ४.लंकेश्वर : लंका + ईश्वर . ५.जलौघ : जल + ओघ . ६.यशोधन : यश + धन . ७.महर्षी : महा +ऋषी . ८.विद्यार्थी : विद्या +अर्थी . ९.सिंहासन : सिंह + आसन . १०.श्रेयश : श्रेय + यश . ७.समास विचार : १.तत्पुष समास : गायरान,कुभकर,अज्ञान,नापसंत,अनादर,अग्रेसर,मावसभाऊ ,साखरभात . २.द्वंद समास : १.इतरेतर द्वंद समास : आणि,व कृष्णार्जुन =कृष्णा आणि अर्जुन ,खरेखोटे =खरे व खोटे. २.वैकल्पिक द्वंद समास : अथवा,किंवा,वा. जयापजय =जय अथवा पराजय. यशपयश =यशा अथवा अपयश . ३.समाहार द्वंद समास : वगैरे . मीठभाकर =चटणी ,कांदा,वगैरे. देवधर्म =पुजा ,आज्ञा,वगैरे. ३.दिवगु समास : १.नऊग्रह : नऊग्रहाचा समूह. २.पंचपाळे : पाच पाल्याचा समूह. ३.नवरात्र : नऊ रात्रीचा समूह. ४.पंचवटी : पाच नद्याच समूह . ४.बहुब्रूही समाज : १.पितांबर : पिवळे वस्त्र धारण केले आहे असा तो महादेव . २.नीलकंठ : नीळा आहे कंठ असतो . ३.गजानन : गजाचे आनंद असतो. ४.भालचंद्र : ज्याच्या शरीरावर भाला असतो. ५.अव्यायी भाव समास : १.दररोज : प्रत्येक दिवसी . २.दरवर्षी : प्रत्येक वर्षी . ८.प्रयोग ओळख : १.मुले विटी दांडू खेळतात : कर्तरी प्रयोग. २.गवळ्याने गाईला बांधले : भावे. ३.रामाने आंबा खाल्ला : कर्मणी प्रयोग . ४.राजु घरी आहे नाही : कर्तरी प्रयोग . ५.राक्षसाने युद्ध केले : कर्मणी प्रयोग . ६.रामाने रावणास मारले : भावे प्रयोग . ९.वाक्य विचार : १.अर्थावरून वाक्याचे प्रकार : १.विधानात्मक वाक्य : मी मराठी वाचतो. २.प्रश्नार्थक वाक्य : तु मराठी वाचतो ? ३.आज्ञार्थी वाक्य : हिंदी वाचा. ४.उदगार वाचक वाक्य : वाह ! खूप मोठे आहे. ५.नकारात्मक वाक्य : मी गणित वाचत नाही . ६.होकारात्मक वाक्य : मी गणित सोडवतो. १०.रचनेवरून वाक्याचे प्रकार : १.सरल (शुद्ध ) वाक्य : मी मराठी वाचतो एक क्रिया. २.मिश्र वाक्य : एक वाक्य प्रधान दुसरे गौण वाक्य. उदा-तो म्हणाला कि मी पुस्तक वाचीन. ३.सयुक्त वाक्य : अनेक उपवाक्य असतात. उदा –राजू शाळेत गेला त्याने शिक्षकास विचारले आणि पेपर सोडायला बसला. ११.काळ विचार : १.वर्तमान काळ : मी मराठी वाचतो. २.भूतकाळ : मी मराठी वाचले . ३.भविष्य काळ : मी मराठी वाचीन. १२.एकूण विरांम् चिन्ह : १.पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो. २.अर्ध विरांम् (;)संयुक्त वाक्यात असतो. ३.अल्प विरांम् (,) : टिळक ,नेहरू ही चांगली माणसे होती. ४.प्रश्न चिन्ह (?) : तु काय वाचतो? ५.उदगारवाचक (!) वाह ! काय चांगले गाडी आहे. ६.अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘): दादा म्हणाला, “तुलदास राम भक्त होते”. ७.संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा. ८.निर्देशक चिन्ह (--): आपले दोन शत्रू आहेत --काम आणि क्रोध . ९.कंस () स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक ) १०.द्वी बिंदू : मोर : आपला राष्ट्रीय पक्षी आहे. ११.अधोरेखा (---------- ): चुकीचे ऐकणे म्हणजे .......... होय .(अपश्रवन) १३.व्याकरणाच्या अध्यापन पध्दती : १.उदगामी पध्दती : (रॉजर बेकन ) प्रथम उदाहरण देणे नंतर त्यावरून नियम स्पष्ट करणे .विशेषां कडून सामान्यकडे ह्या अध्यापन सूत्राचा वापर केला जातो. २.अवगामी पद्धती : (आरिस्टोटल ) प्रथम नियम सांगणे व त्यावरून उदाहरण विचार सामान्याकडून विशेषाकडे या अध्यापन सूत्राचा वापर केला जातो.

शैक्षणिक ॲप्स

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक ॲप्स �� विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक apps �� हे सर्व ॲप्स विद्यार्थ्यांना अध्ययनात मदत करणारे आहेत. खाली दिलेली नावे ॲंण्ड्रॉईड मोबाईलमधील play storeला जाउन टाका व ते ॲप इन्स्टॉल करुन वापरा. 1st grade 35kids picture story ABC English ABC handwriting About India Amazing science Animal encyopedia Animal planet Archaeoist Bheem rupee game Biology for kids First learning game Brain trainer special Country list Doch sight words English conversation English for kids Evomemo Farm scratch 1st grade words 1st grade math 1st grade word play lite Forts of Maharashtra Fundoscience Funny vitamins Fun with dots Gadwat Fun easy learn English First words Hangama kids IMO 1 maths Hindi writing Isro programs Jr science master Kids creation Kids craft idea Kids educational games Kids encyclopedia Kids gk test Kids jigsaw2 Kids learning flowers names Kids learning math lite Kids measurements Kids science experiments Kids tangram free Kids creative puzzle Four seasons Kids maths Kidspedia Kids zoo Know abacus Learn body part in English Learn Hindi number Learn to read Learn to read lite Lit charm pro Lines and shapes free Logic free Logic with bheem Marathi Mharathi mhani Marathi panchatratra Match spell Math art for kids Math challenge Math tricks Mind games Missing letters Nao Olypiad eng grade 1 Panchtratra Phonics spelling and sight words Piano lessons Planet dino Planets space Play and learn Play learn English Play ground for kids Sage kids Sana Olympiad Science experiments Science lab Science school Shivaji &maratha empire Simple drawing lessons Singular plular Sky guide for kids Smarts kids Space puzzle Speakaboos Spelling Tabala master True or false Barakhadi

प्रकल्प

                🎯 101 शालेय प्रकल्प यादी 🎯

1) दिनदर्शिका तयार करणे 2) प्रादेशिक शब्द -अर्थ 3) नदी किनारा 4) समुद्र किनारा 5) सागर सहल 6) कुडींतील लागवड 7) हातरूमालाचा वापर 8) शालेय दप्तर 9) मातकामातील वस्तू 10) शिवणकामातील लहान -लहान कपडे 11) कापडी बॅचेस(बिल्ले )तयार करणे 12) वाया गेलेल्या कागदापासून वस्तू तयार करणे 13) पुठ्ठा कामातून वस्तू तयार करणे 14) भरती ओहोटी कारणे 15) सागरी लाटा फायदे- तोटे 16) आदर्श शाळा 17) पाण्यावरील नाव- होडी 18) हाऊस बोट जहाज 19) पाण्याचा वापर कसा करावा 20) वर्गमुळ-घनमुळ यांचा तक्ता 21) बेरीज -वजाबाकी-भागाकार गुणाकार तक्ता 22) हवेतील तापमान कसे ओळखावे 23) विविध अक्षरांवरून वाक्यप्रचार तयार करणे 24) समानार्थी शब्द 25) विशेषण विशेषनाम 26) लिंग -पुल्लिंग -स्त्रीलिंग 27) विरुद्धधार्थी शब्द 28) श्रम हाच देवता /श्रम हीच पूजा 29) स्वच्छता हाच परमेश्वर 30) आई हिच देवता 31) उत्तम आरोग्य 32) राखण्याचे उपाय 33) परिश्रम हिच पुजा 34) कुलदैवत हेच वैभव 35) आदर्श गाव 36) आदर्श विद्यार्थी 37) आदर्श बालक 38) वीर बालक- बालिका 39) रोपवाटिका 40) आरोग्य हिच संपत्ती 41) कलावंताची माहिती 42) पावसाची गाणी -कविता 43) स्वरांपासून प्रतिकृती तयार करणे 44) परसबाग 45) फुलझाडांची लागवड 46) गच्चीवरील बगीचा 47) शैक्षणिक खेळणी 48) मासे यांची चित्रे काढणे 49) प्राण्याची चित्रे काढणे 50) पक्ष्यांची चित्रे काढणे 51) परिसरातील झाडे 52) परिसरातील उद्याने 53) परिसरातील मंदिरे 54) परिसरातील घरे 55) स्वातंत्रगीतांचा संग्रह करणे 56) ग्रामसभा आयोजित करणे 57) ग्रामपंचायतीची रचना 58) महापुराचे वर्णन 59) धूर विना चूल 60) फळझाडे 61) आमराई 62) नारळी -फोफळीच्या बागा 63) माझा कोकण 64) कोकण वैभव 65) रात्रीचे चांदणे 66) सुर्यदेवता 67) वर्षादेवता 68) जलदेवता 69) खेडूत जिवन 70) मेंढपाळ 71) शेळीपालन 72) शेतातील पिके 73) वृक्षदेवता 74) भौमितिक आकृतींच्या 75) साहाय्याने प्रतिकृती करणे 76) भौमितिक आकृत्यांचा परिचय 77) प्राथमिक आजार -उपाय 78) रोगप्रसार व उपाय 79) गोबर गॅस 80) पाना -फुलांची चित्रे काढणे 81) विद्युत उपकरण दुरुस्ती 82) संत महिलांचा परिचय 83) तुळशीच्या वृंदावनाचे 84) चित्र काढा 85) रांगोळी काढा (साधी ) 86) नक्षीदार रांगोळी 87) रांगोळीचा गालिचा 88) पणत्यांची प्रतिकृती 89) खडू तयार करणे 90) धूपबत्ती तयार करणे 91) मी पाहिलेली जत्रा 92) आमच्या गावाची जत्रा 93) विविध खाद्य पदार्थ 94) पदार्थाच्या चवी उदा.खारट,तिखट इ. 95) पोस्टबाॅक्सचे चित्र - आकार- प्रकार 96) जाहिरात संग्रह 97) वृक्षांची आकृती उदा.आंबा 98) सुचीपर्णी वृक्ष 99) नारळाचे झाड 100) चिंचेचे झाड 101) अशोकाचे झाड

                   संकलन

               सतिश मुणगेकर

संग्राह्य पुस्तके

शिक्षकांनी आवश्य वाचावीत अशी संग्राह्य पुस्तके ०१.) एक होता कारव्हर = वीणा गवाणकर ०२.) वळीव = शंकर पाटील ०३.) ययाती = वि. स. खांडेकर ०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती ०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात ०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले ०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर ०८.) तीन मुले = साने गुरुजी ०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे. १०.) आय डेअर = किरण बेदी ११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे १२.) मृत्युनजय = शिवाजी सावंत १३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे १४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे १५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर १६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद १७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद १८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू १९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार २०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर २१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान २२.) राजयोग = स्वामी विवेकानंद २३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद २४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी २५.) योगासने = व. ग. देवकुळे २६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे २७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद २८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री २९.) रणांगण = विश्राम बेडेकर ३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे ३१.) श्यामची आई = साने गुरुजी ३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे ३३.) १०१ सायन्स गेम्स = आयवर युशिएल ३४.) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे ३५.) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर ३६.) उचल्या = लक्ष्मण गायकवाड ३७.) अमृतवेल = वि.स.खांडेकर ३८.) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर ३९.) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर ४०.) क्रोंचवध = वि.स.खांडेकर ४१.) झोंबी = आनंद यादव ४२.) इल्लम = शंकर पाटील ४३.) ऊन = शंकर पाटील ४४.) झाडाझडती = विश्वास पाटील ४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर ४६.) बाबा आमटे = ग.भ.बापट ४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात ४८.) एक माणूस एक दिवस भाग १ = ह.मो.मराठे ४९.) एक माणूस एक दिवस भाग २ = ह.मो.मराठे ५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ = ह.मो.मराठे ५१.) आई = मोकझिम गार्की ५२.) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी ५३.) बलुत = दया पवार ५४.) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर ५५.) स्वामी = रणजीत देसाई ५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे ५७.) पांगिरा = विश्वास पाटील ५८.) पानिपत = विश्वास पाटील ५९.) युंगंधर = शिवाजी सावंत ६०.) छावा = शिवाजी सावंत ६१.) श्रीमान योगी = रणजीत देसाई ६२.) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले ६३.) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले ६४.) चंगीजखान = उषा परांडे ६५.) आर्य चाणक्य = जनार्धन ओक ६६.) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू ६७.) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती ६८.) वाईज अंड आदर वाईज ६९.) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे ७०.) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे ७१.) यश तुमच्या हातात = शिव खेरा ७२.) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव ७३.) कोसला = भालचंद्र नेमाडे ७४.) बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख ७५.) मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी ७६.) नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते ७७.) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे ७८.) महानायक = विश्वास पाटील ७९.) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर ८०. ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली ८१.) शालेय परिपाठ = धनपाल फटिंग ८२.) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६ = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ८३.) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ८४.) अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे ८५.) यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे ८६.) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे ८७.) द्रुतगणित वेद = श्याम मराठे ८८.) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी ८९.) शिक्षक असावा तर …? = गिजुभाई ९०.) एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने ९१.) दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने ९२.) ऋणसंख्या = नागेश शंकर माने ९३.) गणित छःन्द भाग -२ = वा. के. वाड ९४.) गणित गुणगान = नागेश शंकर मोने ९५.) मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले ९६.) मनोरंजक शुन्य = श्याम मराठे ९७.) उत्तरातून प्रश्ननिर्मिती = नागेश शंकर मोने ९८.) क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट ९९.) संख्यांचे गहिरे रंग = प्रा. मोहन आपटे १००.) चकित करणारे गणिते = श्याम मराठे १०१.) अब्यकस = रवींद्र पुरी १०२.) तंत्र गणिताचे भाग – १ = रवींद्र पुरी १०३.) तंत्र गणिताचे भाग -२ = रवींद्र पुरी १०४.) बहुविध कोडी = रमेश काणकोणकर १०५.) गणितातील कयास खरे व चुकलेले = डॉ. व.ग. टिकेकर १०६.) गमतीदार विज्ञान = निरंजन घाटे १०७.) आठवणीतील शाळा आणि शिक्षण scert पुणे १०८.) माझे सत्याचे प्रयोग = मो.क. गांधी १०९.) माझा वेगळा उपक्रम = नामदेव जरग ११०.) नापास मुलांची गोष्ट = अरूण १११.) ठरल डोळ्स व्हायचं = डॉ. दाभोलकर ११२.) युवा विज्ञान कुतुहल = आनंद घैसास ११३.) शाळेपासुन मुक्ती वर्षापुरती = राहुल अलवारिस ११४.) शिक्षणाचे जादुई बेट = डॉ. अभय बंग ११५.) कोसबाडच्या टेकडीवरुन = अनुताईं वाघ ११६.) प्रिय बाई अ‍नुवाद = सुधा कुलकर्णी ११७.) मुलं नापास का होतात ? = जॉन होल्ट ११८.) ख-या शिक्षणाच्या शोधात = डेव्हिड ग्रिबल ११९.) सहज सोपे सुलभ विज्ञान प्रयोग = अँण्डी बायर्स १२०.) एका समृध्द शाळेचा प्रवास = कबीर वाजपेयी १२१.) मुसाफिरी ज्ञान विज्ञान व शिक्षणाची = प्रा.वसंतराव कर्डिले १२२.) मुल घडताना घडविताना = रेणु दांडेकर १२३.) 800 शालेय प्रकल्प = रेणु दांडेकर १२४.) शिकु या आनंदे = रेणु दांडेकर १२५.) वाचू आनंदे = माधुरी पुरंदरे १२६.) लिहावे नेटके भाग 1,2 = माधुरी पुरंदरे १२७.) शिक्षण: आनंदक्षण = प्रा.रमेश पानसे १२८.) शाळा भेट = नामदेव माळी १२९.) प्रवास ध्यासाचा….आनंद सृजनाचा = लिला पाटील १३०.) शिक्षण देता,घेता = लिला पाटील १३१.) शिक्षणातील लावण्य = लिला पाटील १३२.) बालकहक्क = लिला पाटील १३३.) मुलांच सृजनात्मक लिखाण = मंजिरा निमकर १३४.) रचनावादी शिक्षण = प्रा.रमेश पानसे १३५.) शिक्षण:परिवर्तनाची सामाजिक चळवळ = प्रा.रमेश पानसे १३६.) गोष्टी सांगणार्‍यासाठी चार गोष्टी = ताराबाई मोडक १३७.) दिवास्वप्न = गिजुभाई बधेका १३८.) बिचारी बालके = तारबाई मोडक १३९.) शिकवण्यायोग्य काय आहे? = कृष्ण कुमार १४०.) मुलांची भाषा आणि शिक्षण = कृष्ण कुमार १४१.) आमचा काय गुन्हा = रेणु गावस्कर १४२.) प्रकाशवाटा = डॉ.प्रकाश आमटे १४३.) कल्पक बनुया = अशोक निरफ १४४.) पुण्यभूमी = भारत १४५.) देशोदेशीचे दार्शनिक = प्रा. शिवाजीराव भोसले १४६.) शोध नव्या दिशेचा = संदीप वासलेकर १४७.) गुगलचा इतिहास = अतुल कहाते १४८.) शिक्षण विचार = विनोबा भावे १४९.) शिक्षा और लोकतंत्र = जॉन डिवी १५०.) न पेटलेले दिवे = रा शिरगुप्पे १५१.) दप्तरातल्या कविता संपादन = तृप्ती अंधारे १५२.) का कराचं शिकून? = लक्ष्मण माने १५३.) वैखरी = अशोक केळकर १५४.) समनतेसाठी शिक्षण = जीवन शिक्षण scert पुणे १५५.) विज्ञान तंत्रज्ञान कोश मराठी

खेळ

मनोरंजक खेळ मनोरंजक खेळ विद्यार्थ्यांना अध्ययन निरस वाने वाटू नये म्हणून आपण अधून मधून काही मनोरंजक खेळ घ्यावेत . तसेच या खेळातून त्यांना अध्ययनाचे धडे देण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी काही खेळ मी आपल्यासमोर मांडत आहे. ——————————————————————————————————————- 01 .) स्मरण खेळ – विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण स्मरण खेळ घेऊ शकतो. हा खेळ घेताना टेबलावर २० – २५ लहान लहान वस्तू ठेवाव्यात. उदा. मोबाईल , पेन , पेन्सील ई. आणि त्या वस्तू मुलांना दाखवाव्यात. मुलांना त्या वस्तू लक्षात ठेवायला सांगाव्यात. नंतर त्या वस्तू कापडाने झाकून ठेवाव्यात. नंतर मुलांना लांब लांब बसून त्या वस्तू लिहायला सांगाव्या. त्या वस्तू आठवताना मुलांना फार विचार करावा लागेल. जेणेकरून मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होईल. —————————————————————————————————————– —————————————————————————————————————– 02 ) ओंजळीने ग्लास भरणे – मुलांना या खेळात फार आनंद मिळतो. प्रथम आपण १० – १२ मुलांचे गट करावेत. नंतर समान आकाराचे गटातील संख्ये नुसार ग्लास घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावे. त्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या. मुलांना त्या बादलीतील पाणी ओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेल. ओंजळीने पाणी नेउन त्यांना आपला ग्लास भरावा लागेल. या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईल. यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पण मदत होईल. —————————————————————————————————————– —————————————————————————————————————– 03. ) ठराविक वेळेत गणिते सोडवणे – मुलांना आपण २०-२५ बेरीज , वजाबाकी किवा इतर कोणत्याही प्रकारची २०-२५ लहान लहान कोणत्याही प्रकारची गणिते देऊ शकतो आणि ४-५ मिनिटांचा वेळ देऊन ती गणिते आपण विद्यार्थ्यांना सोडवायला लाऊ शकतो. त्या वेळेत गणिते उत्तरासह सोडवणे अपेक्षित आहे. सुरुवातीला १ अंकी गणिते द्यावीत नंतर चांगला सराव झाल्यास अंक वाढवत जावे. अश्याप्रकारे खेळातून गणिताचा सराव घ्यावा. या खेळत १००% मुलांना सहभागी करावे. —————————————————————————————————————– —————————————————————————————————————– 04. ) एकमेकांना हसवणे – मुले जर कांटाळलेले असतील तर अश्या वेळेस हा खेळ घ्यावा. काही मुलांना सर्वांच्या समोर उभे करावे आणि बसलेल्या मुलांपैकी एकाने येउन त्यांना हसवण्याचा प्रयत्न करावा. मात्र त्यांना हसवताना हात लावायचा नाही. वेगवेगळे हावभाव , वेगवेगळे आवाज काढून , विनोद सांगून त्यांना हसवावे. जे मुले हसतील त्यांना खाली बसवावे आणि जे मुले हसणारच नाहीत त्यांना या खेळाचा विजेता घोषित करावे. —————————————————————————————————————– —————————————————————————————————————– 05. ) आवाज ओळखणे – एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे . बाकी वर्गातल्या / गटातल्या मुलांनी थोड्या अंतरावर उभे राहावे आणि त्या मुलाला नाव घेऊन बोलवावे. त्या आवाजावरून डोळे बांधलेल्या मुलाने कोणी आवाज दिला ते सांगावे . जर त्याने बरोबर ओळखले तर त्याला एक गुण द्यावा . असे सर्व मुले होई पर्यंत खेळ सुरु ठेवावा . ज्याला जास्त गुण मिळतील तो विजयी घोषित करावा. —————————————————————————————————————– —————————————————————————————————————– 06.) खोक्यातील वस्तू ओळखणे – एक मोठे खोके घ्यावे . त्यात लहान लहान बॉल , पेन , पेन्सिल अश्या १०-१२ वस्तू भराव्या . त्यानंतर त्या खोक्याचे तोंड बंद करावे . त्या खोक्याला एका बाजूने मुलांचे हात आत जातील एव्हडे मोठे छिद्र पाडावे. नंतर एका – एका मुलाने त्या खोक्यात हात घालून हाताने चाचपडून वस्तू ओळखाव्या . —————————————————————————————————————– —————————————————————————————————————– 07.) वासावरून वस्तू ओळखणे – बाजारात प्लास्टिक चे ग्लास मिळतात ते आपण आणावे . पण ते ग्लास पारदर्शक नसावेत.नंतर एका – एका ग्लासात कांदा , लसुन अश्याप्रकारे वेगवेगळ्या वस्तू भराव्यात आणि ग्लासला एक एक कागद चिटकवावा. त्या वर चिटकवलेल्या कागदाला सुईने लहान – लहान छिद्र पाडावे आणि मुलांना त्या छीद्रातून वास घेऊन वस्तू ओळखण्यास सांगावे. —————————————————————————————————————– —————————————————————————————————————– 08.) फुगे फोडणे – लहान मुलांसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो . या खेळात आपण काही फुगे फुगवून जमिनीवर सोडावे फुगे फुगवताना त्यात थोडी कमी हवा भरावी . एका – एका मुलाने येउन फुगे फोडण्याचा प्रयत्न करावा. पण न हात पाय लावता आणि ३० सेकंदात फुगे फोडावे. असा नियम ठेवावा. दिलेल्या वेळेत जो मुलगा जास्त फुगे फोडेल तो विजेता घोषित करावा. —————————————————————————————————————– —————————————————————————————————————– 09.) बॉल फेकून मारणे – या खेळात विद्यार्थ्यांचे दोन गट करावे. एक वर्तुळ आखून वर्तुळात एक गट उभा करावा आणि दुसऱ्या गटातील मुलांना ठराविक अंतर घेऊन उभे करावे. त्यांच्या हातात ३ प्लास्टिक चे बॉल द्यावेत. प्रत्येकाला ३-३ बॉल मारता येतील. तो बॉल त्यांनी वर्तुळातील मुलांना फेकून मारावे आणि वर्तुळातील मुलांनी त्या येणाऱ्या बॉल पासून आपला बचाव करावा. जेवढे बॉल वर्तुळातील मुलांना लागतील तेवढे गुण बॉल फेकणाऱ्या मुलांना द्यावेत. सर्व मुले संपल्यावर गट बदलावा. —————————————————————————————————————– —————————————————————————————————————– 10.) नेमबाजी – ठराविक अंतरावर एखादी वस्तू ठेऊन मुलांनी त्या वस्तूला बॉल ने नेम मारावा . प्रत्येकाला ३-३ संधी द्याव्यात जेवढ्या वेळा मुलाचा नेम लागेल तेवढे गुण त्या मुलाला द्यावेत. जास्त गुण घेणारा मुलगा विजेता घोषित करावा. —————————————————————————————————————– —————————————————————————————————————– 11.) विद्यार्थी ओळखणे – एका ओळीत ठराविक १०-१५ विद्यार्थी उभे करावे आणि एका मुलाला ते विद्यार्थी अनुक्रमे कसे उभे राहिले आहेत ते पाहायला लावावे . आणि तोंड फिरून नंतर त्याने त्याच क्रमाने उभे असलेल्या मुलांची नावे सांगावी. नावाचा क्रम चुकल्यास तिथून पुढचे सगळे चुकीचे ठरवावे. अश्याप्रकारे जो मुलगा जास्त विद्यार्थी क्रमाने सांगेल तो विजेता ठरवावा. —————————————————————————————————————– —————————————————————————————————————– 12.) बादलीत चेंडू टाकणे – एक मोठी बदली घेऊन ठराविक अंतरावर ठेवावी आणि फुटबॉल / vollyball घेऊन त्या बादलीत टाकण्यास सांगावे. प्रत्येक मुलाला तीन संधी द्याव्यात . मुलाने किती वेळा बॉल बादलीत टाकला आणि बॉल बादलीत थांबला यावर क्रमांक ठरवावा. —————————————————————————————————————– —————————————————————————————————————– 13.) संदेश पोचवणे – या खेळात १०-१५ मुलांना एका ओळीत बसवावे आणि आपण समोर बसलेल्या मुलाला जवळ बोलवून त्याला एखादे व्याक्य सांगावे. त्या मुलाने जाग्यावर जावून त्याच्या मागे बसलेल्या मुलाच्या कानात ते वाक्य सांगावे. अश्याप्रकारे मुलांनी आपापल्या मागील मुलाला ते वाक्य सांगावे आणि सगळ्यात शेवटी बसलेल्या मुलाने ते वाक्य सगळ्यात पुढे येवून सांगावे. आपण पहिल्या मुलाला सांगितलेले वाक्य आणि शेवटच्या मुलाचे वाक्य फार वेगळे येते. 14.) आंधळी कोशिंबीर – हा खेळ खेळताना एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे.बाकीच्या मुलांनी एक वर्तुळ करून आत थांबावे. डोळे बांधलेल्या मुलाने वर्तुळातील एखाद्या मुलाला पकडावे आणि कोणाला पकडले ते ओळखावे . वर्तुळातील मुलांनी डोळे बांधलेला मुलगा वर्तुळाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्याला वेळोवेळी सूचना द्याव्यात. पट्टी बांधलेला मुलगा ज्या मुलाला पकडेल व ओळखेल त्या मुलाच्या डोळ्यावर नंतर पट्टी बांधावी आणि खेळ पुढे सुरु ठेवावा. —————————————————————————————————————– —————————————————————————————————————– 15.) विष – अमृत – एक मोठे वर्तुळ आखावे . त्यात सर्व मुले पळतील. त्यांना एक मुलगा शिवायला जाईल. तो ज्या मुलाला शिवल त्या मुलाला विष मिळाले असेल त्यामुळे त्याने खाली बसावे. दुसऱ्या मुलांनी त्या बसलेल्या मुलाला शिउन अमृत द्यावे. अमृत मिळाल्यास तो बसलेला मुलगा उठून पळू शकतो. विष देणाऱ्या मुलाने त्यांना अमृत देण्यापासून थांबवावे. —————————————————————————————————————– —————————————————————————————————————

Thursday, 3 March 2016

वाचनाचे टप्पे

आपल्या अध्यापनामध्ये खास ज्ञानरचनावाद पध्दतीचा उपयोग करु इच्छिणाऱ्यांसाठी
. �� ज्ञानरचनावाद पध्दतीने वाचन ढोबळमानाने एकूण सात टप्यात शिकविले जाते-
1. वाचन पुर्वतयारी 2. अक्षर ओळख 3. स्वरचिन्हे ओळख 4. जोडशब्द ओळख 5. वाक्यवाचन 6. परिच्छेद वाचन 7. आकलन
                  ��पहिला टप्पा ��

�� वाचन पुर्वतयारी �� या टप्प्यात खालील प्रकारे वाचनपुर्व तयारी करुन घ्यावी.
1.नजरेने आकारातील साम्यभेद ओळखणे.
2. साम्यभेदाआधारे चित्रवाचन करणे.
3.परिचीत चित्रांसोबत त्याच्या शब्दकार्डांचे अंदाजे वाचन करणे. 4.वाचनासाठी डावीकडुन उजवीकडे नजर फिरविण्याचा सराव.
5. बोललेले शब्द डावीकडुन उजवीकडे लिहिले जातात हे समजणे.
6. शब्दकार्डांचा संबंध चित्राशी व इतर दृश्य वस्तुशी जोडणे, याचा सराव.
        यासाठी आपापल्या कल्पकतेनुसार व परिस्थितीप्रमाणे विविध उपक्रम घेता येतात.
उदा- [खालील उदाहरणे नमुनादाखल आहेत]
     1. आपल्या वर्गातील सर्व मुलांच्या नावाचे नामपट्या बनवून घ्या. या नाम पट्या त्यांना हाताळण्यास द्या. उपस्थित विद्यार्थीनी आपापल्या नावाचे टँग भिंतीस लावण्यास सांगणे.सर्व पट्या एकत्रीत करुन त्यामधून स्वतःच्या नावाची नामपट्टी ओळखण्यास सांगणे. नंतर नंतर इतर विद्यार्थ्यांच्या नामपट्या ओळखण्यास सांगणे. मुले स्वतःचे व इतराचे नाव चार दिवसात ओळखण्यास वाचण्यास शिकतात.
      2. वर्गातील वस्तुंच्या नामपट्या दोन संचामध्ये तयार करुन घ्या.एक संचातील पट्ट्या वस्तूंना डकवा. दुसऱ्या संचातील पट्ट्या मुलास द्या. तुझ्या पट्टीवर जे नाव लिहिले आहे ती वस्तू शोधण्यास सांगणे. किंवा एखाद्या वस्तूची नामपट्टी शोधून काढण्यास सांगणे.
      3. परिचित चित्रांचा व त्याच्या नामपट्यांचा वापर करुन विविध खेळ घेऊ शकतो. -सलग तीन दिवस मुलांना चित्र व त्याखाली शब्दकार्ड लावून वाचन करुन घ्या. नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचे वाचन घ्या.
         सर्वांस शब्दकार्ड वाटा.व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवा. चित्रशब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्या.अशीच सर्व चित्रशब्दकार्ड शोधण्याचा सराव घेणे.
          पुढील तीन दिवस शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणे खेळ घेणे. पुढील तीन दिवस शब्दकार्डाची चित्रकार्डाशी जोडी लावणे. -चित्रपट्टीच्या खाली इतर चित्रांचे नाव टाका. अशा खुप चित्रपट्या बनवा. आता एक चित्रपट्टी विद्यार्थ्यांस द्या.व त्याखालील नाव वाचून त्याचे चित्र असणारी चित्रपट्टी शोधून त्यासमोर लावा.
         आता या चित्रपट्टीच्या खालील नावानुसार पुढील चित्र, त्यानंतर त्यापुढील चित्र अशी चित्रांची आगगाडी बनविण्यास सांगा. -असे अनेक चित्र-शब्द खेळ घेता येतात. शब्द मर्यादेमुळे सर्व येथे मांडणे शक्य नाही.   
         7. दहा शब्द झाले की, वाक्यवाचन सुरु करावे. उदा- हा आंबा(चित्र)आहे. असे वाचन करणे. नंतर चित्राजागेवर शब्द ठेवुन वाक्य वाचनाचा सराव घेणे.
8. दृकशब्दसंपत्ती वाढ ४० पर्यंत जाणे ही वाचनपुर्वतयारी झाली. इथपर्यंत मुले अंदाजाने वाचतात पुर्ण शब्द वाचतात.पण हे प्रत्यक्ष वाचन नव्हे.
9. प्रत्यक्षवाचनासाठी मुले शब्दाचा एकत्रित विचार करतात व वाचन सुलभ होते. ------------------------------------------------------
           आता दुसरा टप्पा ���
              अक्षर ओळख ��
                  या टप्प्यात खालील प्रकारे अक्षर परिचय व त्याचे दृढीकरण करुन द्यावे.
1.चित्राआधारे शब्दाचे अंदाजे वाचन करणे.
2. चित्राशिवाय शब्दाचे सरावाने वाचन करणे. [कमीत कमी ८ दिवस सराव आवश्यक, विविध पध्दतींचा अवलंब]
3. परिचीत शब्दाचे सावकाशपणे वाचन करणे.
[४ दिवसात सरावाने वाचन] 4. त्या शब्दातील प्रत्येक अक्षर सुटे करुन वाचणे. [पुढील ५-६ दिवस]
5. अक्षराच्या आकारातील साम्यभेद ओळखून मुळ अक्षराचे अंदाजाने वाचन करणे. [किमान ८ दिवस सराव आवश्यक]
       यासाठी खालील उपक्रम राबविता येतील. �� वर्गातील प्रत्येक मुलाला स्वतःचे नाव खुप आवडते व ते ७-८ दिवसात त्याच्या नाम पट्यावरील प्रत्येक अक्षर वेगवेगळे करुन वाचते. ते त्याला हाताळण्यास व वाचण्यास प्रोत्साहन द्या. नंतर त्याच्या जिवलग मित्रांच्या नामपट्यातील अक्षरे सुटे वाचण्याचा सराव व नंतर इतर विद्यार्थ्यांच्या नामपट्या वाचनाचा सराव घेणे. अवघड वाटणारे नाव टाळावे. �� यानंतर वर्गातील वस्तूंच्या नाम पट्ट्यांचा सराव घ्या. वस्तूंना अडकावलेल्या शब्दातील सोप्या अक्षराचे वाचन करण्यास प्रोत्साहीत करा. �� यानंतर परिचीत व आवडणारे शब्दपट्या हाताळण्यास देऊन त्यातील अक्षराचे वाचन घ्यावे. �� आता प्रत्येक मुळाक्षराची अक्षरकार्डांची २-३ संच बनवावीत.व ती हाताळण्यास आणि वाचनास द्यावीत. एकाच मुळाक्षरांच्या दोन अक्षर कार्डे शोधणे. त्यांचे वाचन करणे. �� विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वातील सहज सोपे भासणारेच शब्द घ्यावेत.या टप्प्यात आपणास फक्त मुळाअक्षरओळख शिकवायची असल्याने त्याला अवघड वाटणारा शब्द नको. शब्दातील अक्षर वाचन करताना त्याच्या स्वरचिन्ह वाचनाकडे लक्ष देऊ नये. फक्त मुळाक्षर वाचनच घ्यावे. उदा- "शाळा" शब्द वाचताना पहिल्या अक्षरसास 'श' म्हटले की 'शा' हे पाहू नका. या टप्यात हे दोन्ही बरोबरच. 6. अक्षराचे दृढीकरण. वरील प्रत्येक टप्यात आपापल्या कल्पकतेनुसार व परिस्थितीप्रमाणे विविध उपक्रम घेता येतात. उदा- [खालील उदाहरणे नमुनादाखल आहेत, याप्रमाणे अनेक उपक्रम घेता येतात.] ��अक्षर कार्डांच्या मदतीने अक्षर कार्ड व शब्दाशी जुळवणे. उदा- "शाळा" या शब्दकार्डाशी जुळविण्यासाठी 'श' व 'ळ' अक्षरकार्डे शोधून ती त्याखाली मांडणे व वाचन करणे. या ठिकाणी प्रथम तो 'श' 'ळ' अक्षरकार्डास 'शाळा' असेच वाचण्याची शक्यता असते. त्यास येथे थांबवू नका. चूक सांगू नका. काही दिवसाच्या सरावानंतर इतरांचे अनुकरण करत तो आपोआप त्यास 'श' व 'ळ' म्हणू लागेल. असे नाही घडल्यास त्यास नंतर 'श' व 'ळ' असे वाचण्यास प्रोत्साहित करा. �� चित्रकार्डाशी अक्षरकार्डाच्या जोड्या लावणे. यात एक अक्षरकार्ड देऊन त्याचे वाचन करणे. -अक्षरापासून सुरु होणारे चित्रकार्डे शोधणे. -अक्षराने शेवट होणारे चित्रकार्डे शोधून काढणे. -अक्षर मध्ये असणारे चित्रकार्डे शोधणे. �� अक्षराचे मोठे आकार वर्गात काढा. व त्यावर विविध वस्तू [चिंचोके, दगड, फुले,इ.] ठेऊन आकार पुर्ण करणे. �� शिक्षकाने हवेत अक्षराचे आकार काढणे व विद्यार्थ्यांनी ओळखणे, नंतर स्वतः अक्षर सांगणे व विद्यार्थ्यांना त्याचे हवेतील आकार काढण्यास सांगणे. दोन विद्यार्थी किंवा गटामध्येही असा सराव घेता येतो. �� पाटीवर/जमीनीवर माती/वाळू पसरणे व त्यावरील अक्षराचा आकार ओळखणे. नंतर तसे आकार बोटाने काढण्याचा सराव घेणे. ��अक्षरकार्डे जोडून शब्द [फक्त स्वरचिन्ह विरहीत शब्द] बनविणे व त्याचे वाचन. यात विद्यार्थी प्रथम अर्थहीन शब्द बनवतील व वाचतील, हळूहळू अर्थपुर्ण शब्द बनविण्यास प्रोत्साहन देणे. �� असे अनेक चित्र-शब्द खेळ/उपक्रम घेता येतात. शब्द मर्यादेमुळे सर्व येथे मांडणे शक्य नाही. �� वरील टप्यांचा उपयोग करताना घाई करु नये. एखाद्या टप्यात घाई झाल्यास विद्यार्थी त्यापुढील टप्यात गोंधळतात. याठिकाणी एकही अपरिचित शब्द नको. �� पुरेसा सराव व विविध पध्दतीचा अवलंब जेणेकरुन मुले कंटाळणार नाहीत व उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवतील. 7. हळूहळू शब्दवाचनासोबत वाक्यवाचन सुरु करावे. उदा- 'मगर' ही शब्दपट्टी आहे. शब्दाचे वाचन करुन नंतर त्या शब्दापासून वाक्य बनविण्याचा सराव घेणे. -ही मगर आहे. -मगर मोठी आहे. इ. 8. प्रत्यक्ष शब्दवाचनाचा सराव सुरु झाल्यानंतर सुरुवातीस परिचीत व नंतर अपरिचित शब्दवाचनाकडे जावे. [मुर्ताकडून अमुर्ताकडे] 9. 'अक्षरओळख' या टप्प्यात किमान २५-३० अक्षरांचे वाचन मुले करु लागली की शिल्लक अक्षरांचा सराव घ्यावा.परंतु त्याच अक्षरांच्या ओळखीमध्येच न अडकता आपला पुढील टप्पा "स्वरचिन्ह ओळख" घ्यावा. या टप्यात इतर अक्षरे हळूहळू सरावाने येतात.

                               संकलन
                         सतिश मुणगेकर

उदाहरणे

✳ तोंडी/प्रात्यक्षिक उदाहरणे : या उपक्रमात विद्यार्थी उपलब्ध वस्तुंच्या सहाय्याने प्रात्य सांख्यिक क्रिया करतात. ( दोन मुले एकमेकांसमोर उभे राहून हे प्रात्यक्षिक करतात.) उदाहरणार्थ : समीर : माझ्याकडे ९ खडे आहेत, त्यातले काही खड़े मी तुषार ला दिले. तुषार : मला समीर ने ५ खड़े दिले. समीर : आता माझ्याजवळ ४ खडे उरले. तुषार : ९ मधून ५ कमी झाले तर उरले ४. अशा पद्धतीने बेरीज, वजाबाकी या सांख्यिक क्रिया करता येतात.शाब्दिक उदा.कडुन अंकी उदा.कडे मुलांचा प्रवास होतो मिळवणे ,एकुण किती ? म्हणजेच बेरीज करणे ,किती उरले ?किती शिल्लक राहिले म्हणजे कमी करणे वजाबाकी करणे हे संबोध स्पष्ट होतात. मोठ्या इयत्तेची मुले शतक, दशक, एकक चे संबोध घेऊन सांख्यिक क्रिया या पद्धतीने करु शकतात. मिळविणे व कमी करणे या गोष्टी प्रात्यक्षिकातून लवकर समजतात. या संकल्पना समजल्यानंतर (पुरेशा सरावानंतर) मुले अंक मांडून सांख्यिक क्रिया करतात या क्रमाने गेल्यास विद्यार्थ्याला संकल्पना समजल्यामुळे सांख्यिक क्रिया करताना तो सहजतेने उदाहरण सोडवतो. ✳ या उपक्रमामुळे खालील उद्दीष्टे साध्य होण्यास मदत होते . १) मुले सखोल विचार करतात. २) मुले सहजतेने प्रश्ननिर्मिती उदा.तयार करतात . ३) स्वतः उदा.तयार केल्यामुळे उत्तरापर्यंत पटकन पोहचतात. ४) आपल्या सवंगड्या बरोबर अनौपचारीक गप्पातुन सहज पणे या गणिती क्रिया करतात. ५) मुलांवरती कोणताही ताण तणाव राहत नाही . ६) मोठ्या वर्गातील मुलेही तीन अंकी चार अंकी .व मिश्र उदा.तयार करतात .