Thursday 3 March 2016

उदाहरणे

✳ तोंडी/प्रात्यक्षिक उदाहरणे : या उपक्रमात विद्यार्थी उपलब्ध वस्तुंच्या सहाय्याने प्रात्य सांख्यिक क्रिया करतात. ( दोन मुले एकमेकांसमोर उभे राहून हे प्रात्यक्षिक करतात.) उदाहरणार्थ : समीर : माझ्याकडे ९ खडे आहेत, त्यातले काही खड़े मी तुषार ला दिले. तुषार : मला समीर ने ५ खड़े दिले. समीर : आता माझ्याजवळ ४ खडे उरले. तुषार : ९ मधून ५ कमी झाले तर उरले ४. अशा पद्धतीने बेरीज, वजाबाकी या सांख्यिक क्रिया करता येतात.शाब्दिक उदा.कडुन अंकी उदा.कडे मुलांचा प्रवास होतो मिळवणे ,एकुण किती ? म्हणजेच बेरीज करणे ,किती उरले ?किती शिल्लक राहिले म्हणजे कमी करणे वजाबाकी करणे हे संबोध स्पष्ट होतात. मोठ्या इयत्तेची मुले शतक, दशक, एकक चे संबोध घेऊन सांख्यिक क्रिया या पद्धतीने करु शकतात. मिळविणे व कमी करणे या गोष्टी प्रात्यक्षिकातून लवकर समजतात. या संकल्पना समजल्यानंतर (पुरेशा सरावानंतर) मुले अंक मांडून सांख्यिक क्रिया करतात या क्रमाने गेल्यास विद्यार्थ्याला संकल्पना समजल्यामुळे सांख्यिक क्रिया करताना तो सहजतेने उदाहरण सोडवतो. ✳ या उपक्रमामुळे खालील उद्दीष्टे साध्य होण्यास मदत होते . १) मुले सखोल विचार करतात. २) मुले सहजतेने प्रश्ननिर्मिती उदा.तयार करतात . ३) स्वतः उदा.तयार केल्यामुळे उत्तरापर्यंत पटकन पोहचतात. ४) आपल्या सवंगड्या बरोबर अनौपचारीक गप्पातुन सहज पणे या गणिती क्रिया करतात. ५) मुलांवरती कोणताही ताण तणाव राहत नाही . ६) मोठ्या वर्गातील मुलेही तीन अंकी चार अंकी .व मिश्र उदा.तयार करतात .

No comments:

Post a Comment