Monday, 26 September 2016
तंत्रज्ञान
Monday, 20 June 2016
कपालभारती
Tuesday, 19 April 2016
वेबसाईट
Wednesday, 13 April 2016
उपक्रम
🎄ज्ञानरचनावाद उपक्रम🎄 〰〰〰〰〰〰〰〰〰 🦁उपक्रम :-२७) 🎍भागाकार करण्यासाठी वापरावयाच्या वेगवेगळ्या ऱचनावादी पद्धती 🎍 १) व्यवहार पध्दत :- 🌰साहीत्य :- खडे ,गोट्या , मणी , बिया , चिंचोके 🌰 अगोदर विध्यार्थ्याना खडे घेण्यास सांगु . ते विध्यार्थ्यात वाटुन द्या . व त्याना प्रश्न विचारा जसे 👇🏾 उदा . १५ खडे घे . तुझ्या ३ मित्राना एकेक करुन सारखे वाट . १) कीती खडे होते ? २) प्रत्येकालाकीती खडे मिळाल ३) शिल्लक कीती राहीले ? वरीलप्रमाणे आठ दहा वेळा सराव करुन घ्यावा . २) वरील भागाकार पध्दतीचे फलक लेखन जसे 👇🏾 प्रत्येकाला ५ _____________ कीती / खडे १५ विध्यार्थ्याना३ / वाटले १५ / ___________ शिल्लक ०० मुलाकडुन वरील ॲक्टीव्हीटी करुन घ्या . मुल कृती करीत असताना आपण त्याच्या कृतीप्रमाने फलक लेखन करावे . उदा .. संजु कडे १५ खडे होते . त्याने ३ मुलाला समान वाटले तेव्हा प्रत्येकाला ५ खडे मिळाले . आपण ५० पर्यंत संख्याची वाटणी असेच करु शकतो . त्यासाठी विध्यार्थ्याजवळ ५० खड्याची एक पेटी असावी . फरशीवर विध्यार्थ्याला वरील कृती करु द्या . नंतर वहीवर प्रत्येक विध्यार्थ्याजवळ ३६ खडे द्या . पहीले त्या बियाचे २ समान गट करुन घ्या . नंतर त्याच बियाचे ३ समान गट करुन उत्तर मांडा . त्याच बियाचे ४,५,६,७,१० पर्यंत समान गट करुन येणारे उत्तर व शिल्लक कीती राहीले हे विचारा . वरील पध्दतीने ३५ या संख्येचे ३५ गटापर्यंत विध्यार्थी उत्तर काढु शकतात .. याने भरपुर सराव होईल भागाकाराचा . 🙏🏾धन्यवाद 🙏🏾 🔘 🔘 ➖➖➖➖➖➖➖➖➖
Monday, 28 March 2016
वैद्यकीय बील माहिती
वैद्यकीय बील तयार करताना खालील कागदपत्र महत्त्वाची आहेत. ते बिलासोबत सादर करणे आवश्यक आहे.
१) आजाराबाबतचे डॉक्टरांचे इमर्जंसी सर्टीफिकेट.
२) सर्टीफिकेटमध्ये नमूद केलेला आजार हा शासन मान्य एकूण २७ आजारांपैकी असला पाहिजे .
३) डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या पावत्या व प्रत्यक्ष औषधे खरेदी केलेली बीले यावर डॉ .ची सही शिक्का मारुन त्यावर कर्मचाऱ्याची सही मागील बाजूस असावी .
४) सन १९६८ पूर्वी सेवेतील कर्मचारी असेल व मुलांचा जन्म ६८ पूर्वी असेल तर तीन पेक्षा अधिक मुलांची फ्यमिलीसाईज ग्राह्य धरली जाते. पण सन १९६८ नंतरची जन्म झालेली मुले यांची प्यमिली तीन किंवा त्यापेक्षा कमी असेल त्यांनाच वैद्यकीय बील देय आहे.
वैद्यकीय बिलाबाबत सध्याच्या प्रचलित पध्दती व शासन नियमाबाबत या लेखात अल्पशी माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे .
आजार
१) हृदय विकाराचा झटका,फुप्फुसाचा झटका
२) अतिरिक्त दाब
३) धनुर्वात
४) घटसर्प
५) अपघात
६) गर्भपात
७) तिव्र उदर वेदना, आंत्र अवरोध
८) जोरदार रक्तस्त्राव
९) ग्यास्ट्रो
१०) विषमज्वर
११) कोमा
१२) मनोविकृतीची सुरूवात
१३) डोळ्यांतील दृष्टिपटल सरकणे
१४) स्त्री रोग शास्त्र वा प्रसुती शास्त्र संबंधित आजार
१५) जननमूत्र आकस्मिक आजार
१६) वायूकोष
१७)कान नाक घसा यांमध्ये विजातीय पदार्थ गेल्यामुळे निर्माण झालेले
आजार
१८) तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अशा जन्मजात असंगती
१९) ब्रेन ट्युमर
२०) भाजणे
२१) इपिलेक्सी
२२) ॲक्यूट ग्ल्यकोमा
२३) उष्माघात
२४) रक्तासंबंधित आजार
२५) प्राणी चावल्यामुळे होणारी विषबाधा
२६) रसायनामुळे होणारी विषबाधा
गंभीर आजार
१) हृदय शस्त्रक्रिया
२) हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया
३) ॲन्डिओप्लास्टी
४) मुत्रपिंड प्रतिरोपण
५) रक्ताचा कर्करोग
स्वच्छता संदेश
स्वच्छतेचे संदेश
* स्वच्छ ठेवाल भवन तर सफल होईल जीवन.
* प्याल शुद्ध पाणी तर होणार नाही जीवनाची हानी.
* आरोग्याचा मूलमंत्र, शोषखड्ड्याचे सोपे तंत्र .
* परस बाग ज्याचे घरी, आरोग्य नांदेल त्याचे घरी.
* शौचालय बांधण्याची करा घाई,तरच पळेल रोगराई.
* स्वच्छ घर सुंदर परिसर , आरोग्याचे माहेरघर.
* शरीर ठेवाल स्वच्छ तर जिंदगी होईल मस्त .
* पाणी प्याल उकळून तर रोगराई जाईल पळून .
* स्वच्छ ज्यांचा वेश सुखी त्यांचा देश.
पर्यावरण
पर्यावरण घोषवाक्ये
१) रक्षावया पर्यावरण , हाती घ्या वनीकरण.
२) निसर्गाला द्या साथ, प्रदुषणावर करुया मात.
३) जर केला वनसंहार, तर सर्वत्र होईल हाहाकार.
४) कुदळ, फावडे हाती घागर, रोपे लावा या धरणीवर.
५) पाणी जिथे कोंडी, तिथे पीक खंडी खंडी.
६) वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी .
७) जंगलतोडीचे करता पाप, दुष्काळाचा मिळतो शाप.
Monday, 21 March 2016
अनुप्रास
****अनुप्रासाची गंमत****
' काकांनी काकूचे काळे केस कात्रीने कराकरा कापले.कारण काकूने काकांच्या कपाटातले कामाचे कागद कात्रीने कराकरा कापले.'
अशीच वेगवेगळ्या अक्षरांनी सुरु होणारी वाक्ये तुम्ही ऐकली असतील.ठराविक अक्षर वाक्यात पुन्हा पुन्हा येणे म्हणजे अनुप्रास .
चला तर, तुम्हीही तयार करा अशी गमतीशीर वाक्ये .त्यासाठी एका विशिष्ट अक्षराने सुरू होणारी माणसांची नावे, ठिकाणांची नावे, आडनावे, वस्तू , फुल,फळ,प्राणी , पक्षी ,क्रियापदे इत्यादींच्या याद्या तयार केल्यात तर शब्दांच्या क्रमबद्ध जुळणीतून अशी वाक्ये तयार होऊ लागतील.
जसे ---
-------------------------------------------------------------------------------------------
नाव-- पवन
आडनाव --- परांजपे
ठिकाण ---- पुणे
वस्तू ------- पिशवी
क्रियापद ----- पाठवणे
पवन परांजपेने पुण्याला पिशवी पाठवली.
अशी वाक्ये जमली तर तुम्हाला हव्या त्या अक्षरांची बाराखडी घ्या आणि त्या अक्षरांपासून मजेशीर अनुप्रासाची मोठमोठी वाक्ये तयार करा.
Saturday, 19 March 2016
सूर्यमाला
Thursday, 17 March 2016
शिक्षण हक्क कलमे
शिक्षण हक्क कलमे
✏RTE- 2009 चे कलमे-
सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे शीर्षक, कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.
कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
कलम क्रमांक २ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
कलम क्रमांक ५ = दाखला हस्तांतरण.
कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.
कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.
कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.
कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.
कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध .
कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक त्रास प्रतिबंध.
कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .
कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .
कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार .
कलम क्रमांक २१ = शाळा व्यव.स्थापन समिती .
कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .
कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी शर्ती.
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.
कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.
कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.
कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.
कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार.
संकलन
सतिश मुणगेकर