****अनुप्रासाची गंमत****
' काकांनी काकूचे काळे केस कात्रीने कराकरा कापले.कारण काकूने काकांच्या कपाटातले कामाचे कागद कात्रीने कराकरा कापले.'
अशीच वेगवेगळ्या अक्षरांनी सुरु होणारी वाक्ये तुम्ही ऐकली असतील.ठराविक अक्षर वाक्यात पुन्हा पुन्हा येणे म्हणजे अनुप्रास .
चला तर, तुम्हीही तयार करा अशी गमतीशीर वाक्ये .त्यासाठी एका विशिष्ट अक्षराने सुरू होणारी माणसांची नावे, ठिकाणांची नावे, आडनावे, वस्तू , फुल,फळ,प्राणी , पक्षी ,क्रियापदे इत्यादींच्या याद्या तयार केल्यात तर शब्दांच्या क्रमबद्ध जुळणीतून अशी वाक्ये तयार होऊ लागतील.
जसे ---
-------------------------------------------------------------------------------------------
नाव-- पवन
आडनाव --- परांजपे
ठिकाण ---- पुणे
वस्तू ------- पिशवी
क्रियापद ----- पाठवणे
पवन परांजपेने पुण्याला पिशवी पाठवली.
अशी वाक्ये जमली तर तुम्हाला हव्या त्या अक्षरांची बाराखडी घ्या आणि त्या अक्षरांपासून मजेशीर अनुप्रासाची मोठमोठी वाक्ये तयार करा.
No comments:
Post a Comment